Amazon

नाशिक:  गांजा विक्री प्रकरणातील आरोपीला अटक

नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असलेल्या गांजा विक्री प्रकरणातील आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी सागर मोहन ताते (वय: ३२, रा. नाशिक सेंट्रल मार्केट, भद्रकाली, नाशिक) हा भद्रकाली परिसरात येणार असल्याची खबर पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला शिताफीने अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक पोलीस निरीक्षक: सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक: रंजन बेंडाळे, संजय ताजणे, पोलीस हवालदार: बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, अनिरुद्ध येवले, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790