नाशिक: फ्रीजचा शॉक लागल्याने अल्पवयीन हॉटेल कामगाराचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नांदूरनाका भागात फ्रीजमध्ये उतरलेल्या करंटचा शॉक लागल्याने अल्पवयीन हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश कमल परियार (१५ मुळ रा. पिंपळगाव ब.ता.निफाड) असे मृत कामगाराचे नाव आहे. परियार नांदूरनाका भागातील हॉटेल बांबूज येथे कामास होता. बुधवारी (दि.२५) तो हॉटेलमधील किचनमध्ये काम करीत असतांना ही घटना घडली. फ्रीज मध्ये उतरलेल्या इलेक्ट्रीक करंटमुळे हा अपघात झाला.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने त्यास तातडीने नजीकच्या आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषित केले. याबाबत डॉ. प्राजक्ता देवरे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अरूण जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790