नाशिक: भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी वडनेर मार्गावरील गोमासे पेट्रोलपंप परिसरात भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

माधव पंढरीनाथ चोले (३० रा.साईसंगम रो हाऊस,गजरा बिल्डींग शेजारी गौळाणेरोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. चोले गुरूवारी (दि.१९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास एमएच १५ डीजी ४०१९ या दुचाकीने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. घराकडे जात असतांना वडनेर कडून भरधाव येणाºया अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिली.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

या अपघातात चोले गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला.याबाबत भाऊ गणेश चोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790