नाशिक (प्रतिनिधी): झालेल्या ओळखीतून एकाने लॉजवर घेवून जात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल उर्फ आसिफ नुरउददीन सय्यद (रा. शिवाजीनगर सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. औद्योगीक वसाहतीत राहणा-या अल्पवयीन मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी इन्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यमातून तिची संशयिताशी ओळख झाली होती.
जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान संशयिताने मुलीस वेळोवेळी त्र्यंबकेश्वर रोडवरील वेगवेगळया लॉजिंगमध्ये घेवून जात बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २४२/२०२४) अधिक तपास उनिरीक्षक बटूळे करीत आहेत.