नाशिक (प्रतिनिधी): विहितगाव येथील श्री अण्णा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडून रक्कम लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी समांतर तपास करत गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. दानपेटीतून लंपास केलेली चिल्लर घेऊन दोन इसम हे विहितगाव स्मशानभूमीजवळील वीटभट्टी परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना कळविले.
त्यांनी मंगळवारी (दि. २४) त्वरित सापळा रचण्याचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून संशयित आरोपी साजीद हसन खान (२७, रा. विहितगाव), फ्रान्सिस ऊर्फ पप्पू फाजगे (३५ रा. रोकडोबावाडी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता ४ हजार ३९८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. त्यांना उपनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790