जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक प्लॉट क्र पी-15, सातपूर नाशिक या पूर्वीच्या पत्त्यावर नवीन उद्योग भवन इमारत उभारणीचे काम सरु होत असल्याने जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक कार्यालयाचे स्थलांतर एमआयडीसी कार्यालय, उद्योग भवन, मजला क्र 4 येथील गाळा क्रमांक 17, सातपूर नाशिक येथे झाले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

या कार्यालय स्थलांतराची नोंद जिल्ह्यातील सर्व उद्योजक, शासकीय /खासगी आस्थापना, सामाजिक,सार्वजनिक, सहकारी संस्था, औद्योगिक समूह, होतकरू उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790