नाशिक-पुणे रोडवर फटाक्याच्या गोदामाला भीषण आग!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड – शिंदेगाव येथे आज दुपारी फटाकेच्या गोदामाला भीषण आग लागून आगीत गोडावून भस्मसात झाले आहे.

यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले तर काही कामगार गोदामात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' तीन नवीन मार्गांवर सोमवारपासून सिटी लिंक बससेवा सुरु होणार

शिंदेगाव येथे एक फटाक्याचे गोडाऊन आहे. येणारे सण उत्सवाच्या प्रश्वभूमीवर लाखो रुपये किमतीचे फटाके या गोदामात भरून ठेवले होते. आज (दि. १० सप्टेंबर) दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात करणामुळे गोडावूनला आग लागली. आग लागताच फटाक्याना त्याची झळ लागली आणि काही क्षणांमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात

धुराचे मोठ मोठे लोळ दूरवरून दिसू लागले. यादरम्यान घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते, अग्निशमक दल तात्काळ पोहोचले..नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी रवाना झाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790