Amazon

नाशिक: झोपमोड केल्याचा आला राग; डीजे ऑपरेटरवर वार

नाशिक (प्रतिनिधी): डीजे ऑपरेटरचे काम आटोपून घरी जाण्यासाठी डीजे मालकाची रिक्षा घेण्यासाठी हिरावाडीतील कमलनगरमध्ये गेल्यानंतर रिक्षात झोपलेल्या दोघा जणांना आवाज देत उठविल्याच्या कारणावरून डीजे ऑपरेटरला बांबूने मारहाण केली. तसेच धारदार कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मार्केट यार्डातील दुकानावर FDAचा छापा; ३ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त

याबाबत म्हसरूळ राजवाडा येथे राहणाऱ्या फिर्यादी किरण बंडू पगारे याने दिलेल्या तक्रारीवरून दोघा अज्ञात हल्लेखोरांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या रविवारी (दि.८) पगारे हे डीजेचे काम आटोपून घरी जाण्यासाठी हिरावाडी कमलनगर येथे मालकाची रिक्षा घेण्यासाठी गेला होते.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

रिक्षात दोघे जण अगोदरपासून झोपलेले होते. त्यावेळी पगारे याने दोघांना हाक देत उठविले. त्याचा राग आल्याने संशयितानी पगारे याला शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली. त्यानंतर कमरेला लावलेल्या कोयत्यासारख्या धारदार वस्तूने डोक्यात वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमीला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी साक्षिदारांचे जबाब नोंदवून घेतले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790