नाशिकला पावसाचा येलो तर जळगावला ऑरेंज अलर्ट !

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात सोमवारी (दि. २) अमरावती जिल्ह्याला रेड, छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्याला ऑरेंज तर ठाणे व पालघर वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट कुलाबा वेधशाळेने दिला.

रविवारी परभणी येथे ९४, बीड ४६, वाशिम ३१ तर सोलापूर येथे २१ मिमी पाऊस झाला. सोमवारी मराठवाड्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विशेषतः नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790