नाशिक (प्रतिनिधी): राज्यात शुक्रवारपासून (दि.३०) तीन दिवस नाशिकसह मध्य व उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम, कोकण व विदर्भात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
सौराष्ट्र व कच्छ परिसरात हवेच्या अतितीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून शुक्रवारी तो अरबी समुद्रात प्रवेश करून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा गुजरात ते केरळपर्यंत सक्रिय असल्याने पावसाला चांगले वातावरण आहे. २ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसामुळे ऑरेंज तर नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे..
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790