नाशिक: पंचवटी परिसरात धारदार शस्त्राने युवकाचा खून

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृह समोर एका युवकाचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला आहे. खून मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान करण्यात आल्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

खून झालेल्या युवकाचे नाव गगन प्रवीण कोकाटे (वय २५) असे आहे . हा युवक सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याचे समजते. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून संशयित मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
सविस्तर बातमी लवकरच…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790