नाशिक: धावत्या मोपेडमध्ये पदर अडकून महिला ठार; गंगापूर रोडवर घडला अपघात

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोडने मोपेड दुचाकीवरून जात असताना ६२ वर्षीय महिलेच्या साडीचा पदर मोपेडच्या चाकात अडकला आणि मोपेड घसरली. यात अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

विद्या श्रीपाद जावळकर (रा. पायल सोसायटी, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या जावळकर या गुरुवारी (ता. ८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जात होत्या. प्रसाद सर्कलजवळ असताना त्यांच्या साडीचा पदर मोपेडच्या चाकात अडकला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

त्यामुळे त्यांची मोपेड घसरून त्या खाली रस्त्यावर पडल्या. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पती श्रीपाद जावळकर यांनी त्यांना गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, सोमवारी (ता. १२) त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार मोरे हे तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790