जिल्ह्यात आजपर्यंत १८ हजार ९३१ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १८  हजार ९३१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यास 'रेड अलर्ट'; अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २८३, चांदवड ६६ , सिन्नर २४६, दिंडोरी, ५१, निफाड २८५, देवळा ७२,  नांदगांव १५३, येवला १४, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा ०७, पेठ ०१, कळवण ०४,  बागलाण ९८, इगतपुरी ५८, मालेगांव ग्रामीण १०५ असे एकूण  १४६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५४४  तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ८३७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २४  हजार ४५७  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.२९,  टक्के, नाशिक शहरात ८०.३६ टक्के, मालेगाव मध्ये  ६७.५८  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.४९  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७७.४१ इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यु :

नाशिक ग्रामीण १७८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३९५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९५ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६८९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी आज (दि. १७ ऑगस्ट) सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790