नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १६ हजार ९५३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३४५, चांदवड ४३, सिन्नर २१५, दिंडोरी ३९, निफाड २१२, देवळा ६४, नांदगांव १०३, येवला १०, त्र्यंबकेश्वर १३, सुरगाणा ०७, पेठ ००, कळवण ०४, बागलाण ९३, इगतपुरी ४५, मालेगांव ग्रामीण १०३ असे एकूण १२९६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३८२ तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ४ हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २२ हजार ४८५ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.६६, टक्के, नाशिक शहरात ७६.५१ टक्के, मालेगाव मध्ये ७३.३४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.८७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.४० इतके आहे.
कोरोनामुळे झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १७१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३८१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९५ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.