नाशिक: रविशंकर मार्गावर पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. रविशंकर मार्ग येथे हा प्रकार घडला. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भोंदू अशोक उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध ईडीचे ३ हजार पानी दोषारोपपत्र; ४२.८८ कोटींच्या अपहाराचा ठपका

पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रमिला जगझाप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीहून आलेल्या इसमाने गळ्यातील १ लाख २९ हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790