नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) च्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १५ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचे अंतिम वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता बारावीच्या ६४ विषयांची परीक्षा ही होणार आहे. तर इयत्ता दहावीच्या तब्बल ३२ विषयांचे पेपर हे १५ जुलैपासून सुरु केले जाणार आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एकाच दिवशी बारावीच्या सर्व विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. तर इयत्ता १० वीच्या परीक्षा या समाजशास्त्र १५
जुलैपासून सुरू होणार आहेत. लागलीच १६ जुलैला हिंदी ‘कोर्स ए आणि कोर्स बी’ची परीक्षा होईल. १८ रोजी विज्ञान, १९ रोजी गणित (बेसिक अॅण्ड स्टॅण्डर्ड) आणि २० जुलै रोजी इंग्रजीचा पेपर होईल. त्यानंतर २२ जुलैला इतर भाषा जसे संस्कृत, तमिळ, तेलगू, मराठी, मणिपुरी, बोडो, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स आणि आयटीचे पेपर होतील.
दहावीच्या ३० विषयांच्या पेपरची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेची असेल. तर कॉम्प्युटर अॅप्लिकेशन आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन पेपरची परीक्षा ही २ तासांची असेल. तिचा वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजे दरम्यानचा असेल. तसेच बारावीच्या ५६ विषयांचे पेपर हे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान असतील.
आणि ८ पेपरची वेळ ही सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान पार पडेल. दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचे यापूर्वीच निकाल जाहीर झाले आहेत. त्यात दहावीचा निकाली ९३.६ तर बारावीचा निकाल ८७.९८ टक्के लागला होता. त्यानुसार प्रवेशही सुरु झाले आहेत. परंतु आता पुरवणी परीक्षेतून विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. हे विद्यार्थी यंदाच पेपर देऊन चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश ही मिळेल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
![]()

