नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील कोठारी कन्या शाळेजवळ बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्याकडील १ लाख रुपये असलेली कलेक्शनची बॅग चौघांनी लांबविली होती. या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने
पोलिसांसमोर याचा तपास लावणे अवघड होते, मात्र क्राइम ब्रँच युनिट दोनने उल्लेखनीय कामगिरी करून ४ संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते.
या घटनेनंतर क्राइम ब्रँच युनिट २ चे हवालदार प्रकाश भालेराव यांनी गुप्त माहिती घेतली असंता संशयित सिन्नर फाटा परिसरातील एका हॉटेलजवळ असल्याचे
समजले. त्यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सिन्नर फाटा येथे संशयितांना ताब्यात घेतले. विश्वास नितीन श्रीसुंदर (२५, रा. जलशुद्धीकरण केंद्र, नवीन कोर्ट, नाशिकरोड), हारुण निसार कुरेशी (२६, रा. लक्ष्मी अपार्टमेंटसमोर, दसक, जेलरोड), भारत देवीदास चौघरी (रा. एकलहरारोड, मोगल मंझीलजवळ, मगर मळा) व नासिर कमरुद्दिन शेख (२२, रा. गुलशननगर डेपोजवळ, मालेगाव) यांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन ऊर्फ कच्छी (रा. जलशुद्धीकरण केंद्र, नाशिकरोड) असे असल्याचे त्यांनी सांगितले. संशयितांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून दोन कोयते, दोन मोपेड, तीन मोबाइल व लुटून नेलेली रक्कम असा सुमारे एक लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
![]()

