नाशिक: वटपूजेला जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): वटपौर्णिमेनिमित्त पूजाविधीसाठी पायी जाणाऱ्या सुवासिनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार महिलेने हिसकावून पोबारा केल्याची घटना मोटवानीरोड भागात शुक्रवारी (दि.२१) सकाळी घडली.

मोटवाणी रोडवरील साई रतन सोसायटीत राहणाऱ्या मोनाली गणेश गाजरे (वय ३७) व त्यांची मैत्रीण सोनाली बोडके या दोघी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरापासून पायी वटपूजा करण्यासाठी जात होत्या. यावेळी त्यांच्या समोरून दुचाकीवर आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी गाजरे यांच्या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या नाशिकचे दर…
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790