नाशिक: पत्नी-सासू-सास-यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पत्नी व सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा प्रकार दत्तनगर परिसरातील कोणार्कनगर भागात येथे घडला. मुलाच्या वडिलांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोड्या करून कारमध्येच मुक्काम; मुंबईच्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक

पोलिसांनी दिलेली माहिती आणि केशव अंतापूरकर (रा. कोणार्कनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा तुषार अंतापूरकर याचा २००८ मध्ये शीतल हिच्यासोबत विवाह झाला आहे. पत्नी लग्नानंतर दोन महिन्यांतच घरातून निघून गेली. आता गेल्या १५ वर्षांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी आहे. मुलगा तिला घरी येण्यासाठी वारंवार विनंती करत होता. सासरे संशयित वसंत चव्हाण, सासू व शालक यांनी संगनमत करत शारीरिक, मानसिक छळ करत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसरुळला एसटी बस- दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

या छळाला तो कंटाळला होता. आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले असून मंगळवारी (दि. १८) दुपारी ३ वाजता पंख्याला तारेने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पत्नी: शीतल, सासरे: वसंत सोनू चव्हाण, सासू: केदाबाई वसंत चव्हाण (वय: ६०) आणि शालक: पंकज वसंत चव्हाण (वय: ३३) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १८०/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790