Amazon

नाशिक: टवाळखोरांचा धुडगूस; कारची काच फोडून दोघांची केली लुटमार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): शिवाजीनगर परिसरातील फाशीचा डोंगर येथे टवाळखोर चौघांनी कारचालकासह त्याच्या मित्राला कुरापत काढून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील ऐवज हिसकावून घेऊन कारची काचही फोडत लुटमार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नाफेड व एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी प्रक्रियेतील तक्रारी ८ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

कोठावदे (रा. मूळ रा. घाटकोपर, मुंबई) नामक युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १५) पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास तो व त्याचा मित्र असे दोघेजण त्यांच्या टियागो कारमध्ये फाशीचा डोंगराजवळ असलेल्या क्रेव हॉटेलच्या अलीकडून चालले होते. त्यावेळी १८ ते २५ वयोगटातील चौघे संशयित त्याठिकाणी आले आणि त्यांनी ‘तू येथे का थांबला?’ असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार...

तसेच, शिवीगाळ करीत दमदाटी, मारहाण केली. तसेच, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, हातातील घड्याळ आणि रोकड असा १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच त्यांच्या टियागो कारची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक गेगंजे हे तपास करीत आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790