नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दोन वर्षांपासून रखडलेल्या केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत प्रस्तावित १०६ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सपैकी पहिल्या टण्यात २० चार्जिंग स्टेशन्स ऑगस्टमध्ये सुरू केले जाणार आहेत.
केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिल्यानंतर इ-चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासणार आहे. नॅशनल क्लिन एअर पॉलिसी अर्थात एन-कॅपअंतर्गत केंद्र शासनाने इ-चार्जिंग स्टेशन्सकरिता शहरात १०६ जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यात २० ठिकाणच्या इ-चार्जिंग स्टेशन्सची उभारणी जुलैअखेर पूर्ण होणार असल्यची माहिती विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली,
येथे होणार चार्जिंग स्टेशन्स:
पहिल्या टप्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडीअम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जात आहे.