निफाड तालुक्यात वीज पडल्याने तीन गाईंचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

निफाड (दीपक श्रीवास्तव): निफाड परिसरात रविवार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून नांदुर्डी, नांदूर मध्यमेश्वर आणि डोंगरगाव अशा तीन ठिकाणी विजा कोसळल्यामुळे तीन गाईंचा मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

निफाड येथील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड परिसरात रविवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. तालुक्यातील नांदूर मधमेश्वर, नांदुर्डी आणि डोंगरगाव अशा तीन गावांमध्ये विज पडल्याने तीन गाईंचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. रात्री आठ वाजे नंतर सुद्धा संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790