शिक्षक मतदार संघ निवडणूक; ३८ पैकी २ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ ची नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली.  ३१ मे, २०२४ ते ७ जून,२०२४ या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५०० बसचे नियोजन; भाविकांच्या सुरळीत प्रवासासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचा आराखडा

अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय ३० वर्षापेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले आहेत. दराडे किशोर भिकाजी यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार बोठे रणजित नानासाहेब यांचे प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता, तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला, व श्री दराडे किशोर यांचे नामनिर्देशन पत्र “वैध ठरविण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५०० बसचे नियोजन; भाविकांच्या सुरळीत प्रवासासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचा आराखडा

३६ उमेदवार वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेले आहेत. ज्या उमेदवारांना माघार घ्यावयाची असेल ते उमेदवार दि. १२ जून,२०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यत उमेदवार माघार घेऊ शकतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790