नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. गेडाम हे यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त होते. अतिशय कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. डॉ.गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदार्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलावून घेतले.
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना राज्याचे कृषी आयुक्त आणि आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवीन जबाबदारी देण्यात आली होती.