नाशिक: पालकांकडून १० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक, उपशिक्षक ACBच्या जाळ्यात !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सातपूरमधील श्रमिकनगर येथील शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात हिंदी भाषिक मुलांना इयत्ता सातवीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या मोबदल्यात पालकांकडून १० हजार रुपयांची लाच घेताना लाचखोर मुख्याध्यापक सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (५६) व उपशिक्षक दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (५७) यांना शनिवारी (दि. ११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानें रंगेहात पकडले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

मूळ बिहार राज्यातील तक्रारदार यांची दोन्ही मुले मनपा शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत; शाळेत भाषेची अडचण भेडसावत होती. तक्रारदार यांना त्यांच्या मुलांना गुप्ता हिंदी माध्यामिक विद्यालयात प्रवेश हवा होता. यासाठी तक्रारदार यांनी मिश्रा व पांडे यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत विनंती केली. मुलांना

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

प्रवेश देण्याबाबत १६ हजार रुपयांची लाच इमारत निधीच्या नावाखाली मागितली. तक्रारदार यांनी पावती मिळेल का, अशी विचारणा केली असता पावती मिळणार नाही, असे सांगितले. उपअधीक्षक विश्वजित जाधव, हवालदार प्रणय इंगळे, सुनील पवार, सचिन गोसावी, दीपक पवार, आदींनी पांडे यांना शनिवारी लाचेचा १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मिश्रा व गुप्ता यांच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790