नाशिक: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात उद्या (दि. ११) बदल!

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ गुरुवारी (ता. ११) असल्याने त्या पार्श्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने भद्रकालीत गर्दी होऊ शकते. तर त्र्यंबकरोडवरील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणमुळे गर्दी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

तसेच, दूध बाजार, चौक मंडई या परिसरातही खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. या साऱ्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणा सुरळीत असावी, यासाठी शहर वाहतूक विभागातर्फे गुरुवारी (ता. ११) सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

प्रवेश बंद मार्ग:
दूधबाजार चौक ते फाळके रोड टी पॉईंट, फाळके रोड टी पॉईंट ते चौक मंडई, चौक मंडई ते महात्मा फुले पोलीस चौकी, मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल, सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल, मायको सर्कल ते जलतरण तलाव सिग्नल.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

पर्यायी मार्ग:
👉 बादशाही कॉर्नरकडून दूधबाजारकडे जाणारी वाहतूक जुने भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डकडून पिंपळचौक मार्गे त्र्यंबक पोलीस चौकी, गाडगे महाराज पुतळामार्गे इतरत्र
👉 महात्मा फुले चौकातून चौक मंडईकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल, टाळकुटेश्वर मार्गे
👉 मुंबई नाकाकडून गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक संदीप हॉटेलकडून गुरुद्वारा रोड मार्गे
👉 सीबीएसकडून त्र्यंबकनाकाकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नलमार्गे

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

येथे बॅरिकेटींग पॉईंट:
दूध बाजार चौक, फाळके रोड टी पॉईंट, चौक मंडई, महात्मा फुले चौकी, जलतरण सिग्नल, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, सीबीएस सिग्नल

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790