नाशिक: मजूर मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोडवरील सावरकरनगरमधील एका बंगल्याच्या बांधकाम साईटवर भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गंगापूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला अटक

एका खाजगी बंगल्याच्या साईटवर हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेली माहिती आणि संदीप बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गंगापूर रोडवरील बांधकाम साईटचे काम संशयित मनोज चौहान आणि अनिल वाघ या दोन ठेकेदारांनी घेतले आहे. बांधकाम ठिकाणी सुरक्षिततेच्या कुठल्याही उपाययोजना न केल्याने भिंत कोसळून त्याखाली दाबून प्रभाकर बोरसे आणि गोकुळ पोटिंदे हे मजूर ठार झाले तर अनिल जाधव आणि संतोष दरुणे हे दोघे गंभीर जखमी आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790