येत्या ४८ तासांत वाढणार उन्हाचा तडाखा; मालेगावी उच्चांकी ३९.२

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): विदर्भावर वाऱ्याची चक्रीय स्थिती असून तेथे हिमालयातील पश्चिमी चक्रावातामुळे तयार झालेले बाष्प ओढले गेले असल्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार असून आगामी ४८ तासांत किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. गुरुवारी मालेगाव येथे उच्चांकी ३९.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. कोरड्या हवामानामुळे सरासरी तापमानातही १ अंशाने वाढ नोंदविण्यात आली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) रोजगार मेळाव्याचे आयोजन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790