नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नोकरी लावून देतो व लग्न करण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली
अधिक माहिती अशी, की गणेश गोविंदराव झेंडे (रा. टाकळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांची व पीडित महिलेची एकाच परिसरात राहत असल्याने ओळख होती. पीडितेला नोकरी लावून देतो, असे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. नंतर त्याने ऑगस्ट २०२१ पासून ते जुलै २०२३ पर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
नंतर त्याने तिला जातिवाचक शिवीगाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. पीडितेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून (गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४/२०२४), पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत.