नाशिक: चोरट्यांचा सुळसुळाट.. पार्क केलेल्या कारच्या चाकांची चोरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. पार्क केलेल्या किया कारची चाके चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून युवकावर कोयत्याने हल्ला

एकलहरारोड भागात पार्क केलेल्या किया कारची चाके चोरट्यांनी चोरून नेली. चोरट्यांनी डिक्ससह चाके पळविली आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ.माधवी वैभव गायकवाड (रा. मेट्रो मॉलजवळ, आगरटाकळी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. डॉ. गायकवाड यांची किया कार एमएच १५ एचवाय ६२१३ मंगळवारी (दि.१२) रात्री एकलहरारोडवरील गवळीबाबा मंदिरासमोर पार्क केलेली असतांना ही घटना घडली.

हे ही वाचा:  नाशिक: जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाचे आता रूपडे पालटणार

अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारची पुढील बाजूची सुमारे २० हजार रूपये किमतीची दोन चाके डिस्कसह काढून लंपास केली आहेत. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790