🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: पार्क केलेल्या कारमधून एक लाखाची रोकड केली लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मानवता कॅन्सर सेंटर परिसरात पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. या बॅगेत कपडे व एक लाखाची रोकड होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उद्योग सुलभीकरणासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

भुषण भिकचंद संकलेचा (रा.धुळे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संकलेचा सोमवारी (दि.११) कामानिमित्त शहरात आले होते. मानवता कॅन्सर सेंटरच्या पाठीमागील सारडा सर्कल ते मुंबईनाका दरम्यानच्या मार्गावर त्यांनी आपली कार पार्क केली असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्याबाजूची काच फोडून सिटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत एक लाखाची रोकड व कपडे होते. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790