नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महाशिवरात्री निमित्ताने गोदाघाटावरील श्री. कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर श्री. कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत, तर पर्यायी मार्गांनी वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्या मार्गांवर वाहनचालकांनी वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.
शुक्रवारी (ता.८) महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.८) पहाटे ५ वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कपालेश्वर मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.
तसेच, कपालेश्वर मंदिरापासून पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सरदार चौक, काळाराम मंदिर या मार्गे मिरवणूक काढली जात असते. यामुळेही वाहतूक कोंडीची शक्यता असते. तरी वाहनाचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक शाखेतर्फे जारी करण्यात आलेली आहे.
प्रवेश बंद असलेले मार्ग: ढिकले वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, सरदार चौकांकडून जाणारा मार्ग, गाडगे महाराज पुलाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग