नाशिक: शेअर गुंतवणुकीचे आमिषाने तरुणाला २ कोटींचा गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत तसेच फिक्स डिपॉझिट करण्यास सांगत त्यावर जादा परताव्याचे आमिष देत खासगी नोकरदाराला २ कोटी १३ लाख ५० हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जनगणना 2027 स्वगणनेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पोलिसांनी दिलेली माहिती आणि नोकरदार तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये डीमॅट खाते उघडले होते. काही दिवसांनी आयटी बुक्स कंपनीचा प्रतिनिधी समीर उपाध्य, अभिनव मिश्रा, गुंतवणूक कंपनीचा प्रतिनिधी अभिषेक शर्मा, तिलक जोशी, आदित्य रस्तोगी यांनी संपर्क साधला.

विविध कंपन्यांच्या पोर्टफोलिओची तोंडी व इमेलद्वारे माहिती देत या कंपन्याचे शेअर्स घेतल्यास जादा परतावा मिळेल असे सांगितले. विश्वास बसल्याने तरुणाने विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले. संशयितांनी शेअर्समध्ये मार्केटनुसार होणाऱ्या नफ्याची माहिती इमेलद्वारे पाठवत विश्वास निर्माण केला.

🔎 हे वाचलं का?:  एप्रिलमध्येच उष्णतेचा कडाका; राज्यात तापमानाचे उच्चांक, ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट

शेअर्समधील गुंतवणुकीसह आमच्या ट्रेडिंग कंपनीत फिक्स डिपॉझिट केल्यास दुप्पट परताव्याचे अमिष दिले. संबंधित तक्रारदाराला विश्वास बसल्याने त्यांनी संशयितांना वेळोवेळी २ कोटी १३ लाख ५० हजार रुपये दिले. नफा झाल्याने पैसे काढण्यासाठी व शेअर्स विक्री करण्यास सांगितले असता संशयितांनी कंपनीत आगाऊ रक्कम भरण्यास सांगीतले. तक्रारदाराने पैसे भरल्यानंतर संशयिताकडून आणखी पैशांची मागणी होऊ लागल्याने संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दिली. सहायक निरीक्षक प्रतीक पाटील तपास करत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात

नातेवाईक, मित्रांकडून घेतले पैसे:
कमी वेळेत जादा परतावा मिळणार असल्याने तरुणाने नातेवाईक व मित्रांकडून दोन महिने, सहा महिन्यांच्या बोलीवर पैसे घेत त्या रकमेची गुंतवणूक केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790