नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयाच्या वर ‘विवा स्पा’च्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने सापळा रचून या ठिकाणी उपनगर पोलीसांनी छापा टाकला असता, यावेळी चार तरुणीची सुटका करण्यात आली तर दोन इसमांना पोलीसांनी अटक केली आहे. उपनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की, नाशिक पुणे महामार्गावरील स्टार झोन मॉल मधील दुसऱ्या मजल्यावर विवा स्पा सुरु होते. या ठिकाणी स्पा च्या नावाखाली मालक मयुर देव, स्पा चा मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहु (वय २४) आणि मदतनीस रुपेश कुमार बरार (वय २४) हे संगनमत करुन तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत होते.
याबाबत पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यांना या ठिकाणी चार तरुणी मिळुन आल्या. पोलीसांनी तरुणींची सुटका केली तर साहु आणि बरार यांना ताब्यात घेतले आहे.