नाशिक: महामार्गावर प्रवाशांच्या कार फोडून लूटमार करणाऱ्या दोघांना अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई – आग्रा महामार्गावर प्रवाशांच्या कारची तोडफोड करून कोयत्याचा धाक दाखवून किंमती ऐवज बळजबरी हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

याप्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर संशयिताचा तिसरा साथीदार भद्रकालीतील गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात दाखल आहे.

तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती, (३०, रा. नानावली, मानुर रोड), प्रविण उर्फ चाफा निंबानी काळे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, मोहम्मद अन्वर सय्यद (रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, नानावली, जुने नाशिक) हा सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

स्थानिक गुन्हेशाखेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १ जानेवारीला महामार्गावरील मुंढेगाव शिवारात किरण कावळे (रा. ठाणे) हे त्यांच्या मित्रांसह रस्त्यालगत रात्रीच्या वेळी थांबले होते.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित तिघांनी त्यांच्या कारची काच फोडून कोयत्याचा धाक दाखविला आणि किरण व त्यांच्या मित्रांकडील सोन्याच्या चैन, मोबाईल व रोकड असा ७० हजार ५७० रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. याचप्रमाणे, गेल्या १३ जानेवारीला वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीनकुमार जैन (रा. मुंबई) यांच्याही कारची काच फोडून शस्त्रांचा धाक दाखवून ८२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

या लुटमारीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हेशाखेचे पथक करीत असताना, गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धती व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित तौसिफ व प्रवीण या दोघांना ग्रामीण पोलीसांनी जुने नाशिकमधून अटक केली.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

चौकशीत संशयितांनी तिसरा साथीदार मोहम्मद याच्या मदतीने लुटमार केल्याची कबुली दिली. संशयितांकडून ९ मोबाईल, सोन्याची चैन व दुचाकी असा ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नाशिकमधील भद्रकाली पोलीसात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, नाइक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, भुषण रानडे यांच्या पथकाने बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790