नाशिक: निवृत्तीनाथ महाराज यात्रा; २७० बसेसच्या सिटी लिंककडून फेऱ्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा मंगळवारी (दि. ६) होणार आहे. या यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतात व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

यात्रेकरिता लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये व भाविकांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाता यावे यासाठी सिटीलिंकच्या वतीने २७० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

सिटीलिंककडून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर व निमाणी ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर दैनंदिन २८ बसेसच्या एकूण १८० बसफेऱ्या चालविण्यात येतात. परंतु यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सिटीलिंकने तपोवन डेपोच्या ३ व नाशिकरोड डेपोच्या ११ अशा एकूण १४ जादा बसेसचे नियोजन केले असून या १४ बसेसच्या माध्यमातून एकूण ९० अतिरिक्त बसफेऱ्या करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट 'मकोका' लावणार; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आदेश

६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस या अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही दिवशी दैनंदिन २८ व अतिरिक्त ११ अशा एकूण ३९ बसेसच्या २७० बसफेऱ्या होणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790