नाशिक: ५०० किलो गोमांस जप्त; क्राईम ब्रांच युनिट १ ची कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी):  इंदिरानगर परिसरातील खोडेनगरमध्ये ५०० किलो गोवंशा मांस विक्रीसाठी आणले असता, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.

पिकअपसह गोवंशाचे मास असा ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अमीर असद कुरेशी (२७, रा. संगमनेर, जि. नगर), सलमान इकबाल कुरेशी (२८, रा. चौक मंडई, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला अटक

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथून पिकअपमध्ये मोठ्याप्रमाणात गोवंशाचे मांस विक्रीसाठी नाशिकमधील खोडेनगर येथे आणण्यात येणार होते.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिली असता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोडेनगर परिसरात पहाटेला सापळा रचण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

गोवंशाचे मांस घेऊन पिकअप आला असता दबा धरून असलेल्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. यावेळी पिकअपमध्ये ५०० किलो गोवंशाचे मांस आणण्यात आले होते.

ते संशयित अमीर कुरेशी याच्याकडून संशयित सलमान कुरेशी खरेदी करून मुंबई नाका, भद्रकाली, वडाळानाका याठिकाणी त्याची किरकोळ विक्री केली जाणार होती. पिकअप (एमएच १४ डीएम ३००६) व गोवंश मांस असा ८ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, मिलिंदसिंग परदेशी, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, किरण शिरसाठ यांनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790