नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद येथील काकड मळ्यात चोरीछुपे सुरू असलेल्या जुगार अड्डा शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला.
पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेत रोकड, मोबाइलसह चारचाकी कार असा 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर आयुक्तालयातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेचे उपनिरीक्षक दिलीप सगळे, हवालदार किशोर रोकडे यांना मखमलाबाद गावातील काकड मळा येथे सुरेश मुरलीधर काकड हा तिरट नावाचा जुगार खेळतो व खेळवित असल्याची खब मिळाली होती.
विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी काकड मळ्यातील सुरेश काकड त्याच्या घराचे पाठीमागे वॉलकंम्पाऊंडजवळ मोकळया जागेत जुना चांदशी रोड या ठिकाणी पत्त्याचा जुगार अड्डा सुरू होता.
दबा धरून असलेल्या विशेष शाखेने त्यावर छापा टाकला. यावेळी सुरेश मुरलीधर काकड (५१, रा. मानसी महल, संभाजी चौक, मेनरोड, मखमलाबाद नाशिक), स्वप्नील रमेश मानकर (३०, रा. मानकर मळा, मखमलाबाद रोड), अनिल जगन्नाथ मानकर (५३, रा. राम मंदिराचे समोर, मखमलाबाद), दत्तु किसन सुर्यवंशी (४३, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद), भगवान मोतीराम काकड (४०, रा. मखमलाबाद, नाशिक), रविकांत गणपत गामणे (४०, रा. कुंभार गल्ली, मखमलाबाद), अक्षय सुनिल काकड (३८, रा.. मानकर मळा, मखमलाबाद), विश्वनाथ प्रकाश काकड (४६, रा. मानकर मळा, मखमलाबाद), प्रकाश देवराम पिंगळे (४०, रा. मखमलाबाद), विशाल ज्ञानेश्वर काकड (३४, रा. मखमलाबाद), सुनिल रघुनाथ काकड (५०, रा. काकड मळा, मखमलाबाद) यांना जागेवरून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडुन ७६ हजार २२० रुपयांची रोकड, ७८ हजारांचे मोबाईल), २७ लाख ९० हजारांच्या चारचाकी कार असा एकुण २९ लाख ४४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अंमलदार भगवान जाधव यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून आरोपींवर म्हसरूळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक दिलीप भोई, दिलीप सगळे, किशोर रोकडे, भामरे, डंबाळे, भुषण सोनवणे, योगेश चव्हाण, दिघे, भगवान जाधव, या पथकाने कामगिरी केली आहे