नाशिक: भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील ट्रक टर्मिनल भागात भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विनायक चिंतामन गोसावी (२६ रा.दत्तनगर आडगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 12 जुलै पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोसावी गेल्या रविवारी (दि.२१) महामार्गावरून आपल्या दुचाकीने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनल समोर भरधाव एमएच १२ केवाय ७३४३ या चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने गोसावी जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  हिट अँड रन: राणेनगर उड्डाणपुलाजवळ कारच्या धडकेत मजूर दाम्पत्याचा मृत्यू

याबाबत रोशन बावा (गोसावी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790