नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. भारतात बंदी असलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
हुजेफ अब्दुल अजीज शेख असं ATS ने अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कोर्टाने संशयित आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली हुजेफ अब्दुल अजीज शेख (वय ३०) याला अटक करण्यात आली.
आरोपी हा उच्च शिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. आता एटीएसने शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये आपली पथकं रवाना केली आहेत.
आरोपीच्या घर झडतीत एटीएसने 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत केला आहे. संशयित सीरिया मधील हुजेब शेख राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची एटीएसची माहिती आहे.
आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाकडून आरोपीला शेखला 31 जानेवारीपर्यंत सुनावली एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.