नाशिक: सापळा रचत चोरटा जेरबंद, ६ दुचाकी जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एमआयडीसीतील चुंचाळे पोलिसांनी सराईत दुचाकीचोरास अटक करून त्याच्याकडून दोन लाख १२ हजार किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या.

अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा कॉलनी, दत्तनगर, घरकुल या भागांतून मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी झाली होती. या चोरांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान एमआयडीसी पोलिसांसमोर होते.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेचा कहर; काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता, मे मध्ये ‘रेड झोन’चा इशारा

पोलिस नाईक समाधान चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की, वरचे चुंचाळे, दत्तनगर परिसरात दुचाकीचोर आला आहे. या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत वरचे चुंचाळे येथील बुद्धविहार या ठिकाणी सापळा रचून संशयित किरण राजू गांगुर्डे ऊर्फ काळ्या यास ताब्यात घेतले. त्याने इतर साथीदारांसह दुचाकीचोरीची कबुली दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790