नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद गावातील बसस्थानक परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला आहे.
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार कुणाल सुधाकर एखंडे (रा. पिंगळे मळा, शांतिनगर) व सुनील ऊर्फ सोनू बाबूराव धात्रक (रा. स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद) असे गावठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार गुणवंत गायकवाड यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मखमलाबाद बसस्थानकावर सापळा लावला असता पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळून जाऊ लागले. त्यातील कुणाल सुधाकर एखंडे यास गावठी बनावटीच्या कट्ट्यासह ताब्यात घेतले.
त्याचा दुसरा साथीदार सोनू धात्रक हा मात्र फरार झाला. सदर कामगिरी वरिष्ठ निरीक्षक राजू पाचोरकर, सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, विनायक आहिरे, सहाय्यक उपनिरीक्षक व्ही. जे. भोज, सतीश वसावे, संजय गवारे, सोनवणे, कवीश्वर खराटे, गुणवंत गायकवाड, जितेंद्र शिंदे, पंकज चव्हाण यांनी केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.