नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील हिरावाडी परिसरात भरधाव चारचाकीने कट मारल्याने ३० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात डबलसिट प्रवास करणारा युवकही जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
वाल्मिक जिभाऊ पाटील (३० रा. शिवदर्शन अपा.तांबोळीनगर हिरावाडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पाटील सोमवारी (दि.१५) रात्री हिरावाडी रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होते. नंदिनी अगरबत्ती दुकानासमोर पाठीमागून भरधाव येणा-या एमएच १५ सीएम ९८२९ चारचाकीने अचानक वळण घेतल्याने हा अपघात झाला.
या अपघातात पाटील यांच्यासह पाठीमागे बसलेले करण संजय लेवे (२८ रा. गजानन चौक,गुरूद्वाराजवळ पंचवटी) हे दुभाजकावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले होते.
दोघांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता पाटील यांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत लेवे याच्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वनवे करीत आहेत.