नाशिक: सराफ बाजारातून महिलेची पर्स लांबविणारे चोरटे जेरबंद….

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सराफ बाजारातून महिलेची पर्स लांबविणारे चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-१ ने जेरबंद केले आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने बाजुला ठेवलेली पर्स तिचे लक्ष नसतांना मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चोरली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

या चोरटयांचा सराफ बाजार ते भद्रकाली परिसरात पाठलाग करण्यात आला होता. पण, गर्दीचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले होते. त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा शोध घेतांना पोलिसांनी चोरटयांचा शोध घेत असतांना आजु बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत

हे फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन मोहम्मद नाशर सैय्यद, वय-१९ वर्षे, रा-पाटाच्या जवळ, फुलेनगर पंचवटी नाशिक, अफजल शब्बीर सैय्यद, वय- १८ वर्षे, रा- पाटाच्या जवळ, फुलेनगर पंचवटी नाशिक या दोघांना गजाआड केले.

या आरोपींकडून चोरी करतांना वापरण्यात आलेली मोटार सायकल व रोख रक्कम असा एकूण ९३ हजार किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. या दोन्ही आरोपींना सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790