नाशिक: कोयत्याने वार करून लूट करणाऱ्यांना अटक; कारच्या अर्धवट क्रमांकावरून सुगावा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एका तेल एजन्सीमध्ये नोकरी करणारा नोकरदार ग्राहकांकडून वसुली करून १ लाख ६८ हजारांची रोकड घेऊन दुचाकीने वडनेर-पाथर्डी रस्त्याने प्रवास करीत होता.

कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी कुरापत काढून त्याची वाट रोखून कोयत्याने वार करून जबरी लूट केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या तिघा हल्लेखोरांचा उपनगर पोलिसांनी शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख ४० हजारांची रोकड व गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

तेल एजन्सीमध्ये काम करणारे प्रकाश बन्सी मरसाळे हे मागील आठवड्यात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सातपूर अंबड भागातून उधारी वसूल करून दुचाकीने वडनेर रोड मार्गे घरी येत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तिघा इसमांपैकी एकाने मरसाळे यांच्या हेल्मेटवर

कोयत्याने वार करून दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्या बॅगेमध्ये असलेली १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड व तीन लाख रुपयांचे धनादेश बळजबरीने हिसकावून धूम ठोकली होती.

या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे, बाबासाहेब दुकळे, सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन, सोमनाथ गंड, अनिल शिंदे, जयंत शिंदे, पंकज कर्पे, सूरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रघतवान, राहुल जगताप यांनी गुन्ह्याची उकल करीत हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

नाशिक रोडच्या रोकडोबावाडी परिसरातून पोलिसांनी संशयित चंद्रकांत विजय काकडे (२३), शाहबाज शफी शेख (२१), सोनू छबू गवळी (२०, तिघे रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव) यांना बेड्या ठोकल्या, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी जबरी चोरी केल्याची कबूली दिली.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

कारच्या अर्धवट क्रमांकावरून सुगावा:
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करत त्यावरून गुन्ह्यातील कारचा अर्धवट क्रमांक मिळविला. तसेच देवळालीगाव भागातील रोकडोबावाडी येथील दोन-तीन युवक गेल्या काही दिवसांपासून बाहेर असल्याची गोपनीय माहिती मिळवली.

तसेच संशयित शहबाज शफिक शेख (रा. रोकडोबावाडी) याने काही दिवसांपूर्वीच एका तेल एजन्सीमधून नोकरी सोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनच्या आधारे हुडकून काढले. काकडे याने त्याची कार (एमएच १२-जीबी ६७०४) गुन्हा करण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790