नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): स्वच्छता कर्मचाऱ्याला अस्वच्छतेच्या कारणावरून घेराव घालत जाब विचारणाऱ्या तिघांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळागाव येथे घडली.
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्वच्छता कर्मचारी अजय बाळू दाणी (रा. पंचशीलनगर) हे सल्ली पॉइंट, वडाळागाव येथे कचराकुंडी उभी करण्याचे काम करत होते.
त्यावेळी अस्वच्छतेच्या कारणावरून जाब विचारणाऱ्या तिघांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने दाणी यांच्या डोक्यात व शरीरावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयितांचा तपास करत आहेत.