नाशिक: भरधाव दुचाकी घसरल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): लहवितरोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर इसम दुचाकीवर डबलसिट बसून प्रवास करीत होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दुचाकी चालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. ३०) वीजपुरवठा बंद राहणार…

राजेंद्र अशोक टाकळकर (रा.वैष्णव विहार सोसा.संसरीगाव) असे दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पत्नी योगिता टाकळकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

टाकळकर गेल्या शनिवारी (दि.९) दिपक नंदकिशोर कनोजिया (रा.संसरीगाव दे.कॅम्प) यांच्या दुचाकीवर डबलसिट बसून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १४ भरारी पथकांची संयुक्त मोहीम; आतापर्यंत ३८ गोवंश जनावरांची सुटका

दोघे जण लहवितरोडने प्रवास करीत असतांना पाटील नर्सरी भागात भरधाव दुचाकी घसरल्याने टाकळकर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दुचाकी चालक कनोजिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790