नाशिक: भरदिवसा झालेल्या घरफोडीत पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाचा ऐवज चोरुन नेला. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले.

दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोल पंप भागात ही घरफोडी झाली. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  मार्चच्या अवघ्या १२ दिवसांतच नाशिकचा पारा ३८ अंशांपार; दशकातील पहिली नोंद

गणेश नंदू खुर्दळ (रा.रतन हौ.सोसा.सावरकर गार्डन) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. खुर्दळ कुटुंबिय गुरूवारी (दि.१४) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ८४ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790