नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे साडेपाच वर्षीय रोहीणी युवराज कडाळे या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. झालेल्या घटनेने पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दिंडोरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले हे वारंवार वाढतच चालले असून या बिबट्यांच्या बंदोबस्त का होत नाही.? असा सवाल दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे दोन वर्षांत दोन निष्पाप शाळकरी मुलांचा बिबट्याने हल्ला करून बळी घेतला आहे. त्याच बरोबर शेतीकामासाठी आलेले मजूर त्यांची मुलगी हिच्यावर देखील निळवंडी येथे बिबट्याने हल्ला चढवला होता. स्थानिक नातेवाईक यांनी आरडाओरड केली, त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.
ह्या सर्व घटना ताज्या असतानाच दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील साडेपाच वर्षीय रोहिणी युवराज कडाळे या बालिकेवर बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला करून तिला जखमी केले आहे. सदर पीडित मुलीचे कुटुंब हे उदरनिर्वाह करण्यासाठी वनारवाडी येथे आले असल्याची प्राथमिक माहिती कळते. सदर कुटुंब व नातेवाईक आपले रोजचे काम आटोपून आपल्या ठिय्याकडे जात असताना रस्त्यालगत असलेल्या उसात बिबट्या दबा धरून बसलेला होता. व पीडित मुलगी आपल्या आईच्या हाताला पकडून ठिय्याकडे जात असताना अचानक बिबट्याने सदर मुलीवर हल्ला केला. व वेळीच सोबत जात असलेल्या नातेवाईक यांनी आरडाओरडा करत बिबट्याला हाकलून लावले.