नाशिक: पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्यू: दिवाळीच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलच्या पाण्याची टाकी स्वच्छ करताना शॉक लागून खुटवडनगर येथील युवकाचा मृत्यू झाला.

दिवाळीच्या दिवशीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण दिगंबर शिनकर, (३०, खुटवडनगर, कामटवाडा) हे सोमवारी दुपारी दीड वाजता पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना टाकीत पडून शॉक लागल्याने त्याला उपचारासाठी त्याचा भाऊ विजय शिनकर यांनी वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे विजेचा शॉक लागल्याबाबत पोलिसांनी विद्युत विभागाला पत्र देऊन माहिती मागितली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790